पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील एचए शाळेची वीज गेल्या एकवीस दिवसांपासून बंद आहे. येथील व्यवस्थापनाकडून विजेबाबत चोरीचे कारण दिले जात आहे. त्याचा नाहक त्रास विद्यार्थी व शिक्षकांना होत आहे.

या संदर्भात भाजपा पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयातून एच.ए.कंपनीचे उपमहाव्यवस्थापक अनुप सिंग यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडे विजेबाबत चौकशी केली. त्यांनी चोरीचे कारण देत पोलीसात तक्रार केल्याचे म्हटले. तसेच शाळेची विज लवकरच सुरू करू, असे आश्वासन त्यांनी गोरखे यांना दिले आहे.
दरम्यान यंदा शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. शाळेमध्ये तीन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी व दोनशे पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. विज बंद असल्याने शाळेतील सर्व यंत्रणा ठप्प असून विज, विजेवरील पंखे, कुलर्स त्याचबरोबर पाण्याअभावी शौचालयात अस्वच्छता पसरली आहे.
शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होत असून विद्यार्थ्यांची कुचंबना होत आहे. याला जबाबदार कंपनी व्यवस्थापक असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी अमित गोरखे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
























Join Our Whatsapp Group