पिंपरी (Pclive7.com):- परतीच्या प्रवासासाठी देहू नगरीच्या दिशेने निघालेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आज पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसदस्य दत्ता वाघेरे, संदीप वाघेरे, माजी नगरसेविका उषा संजोग वाघेरे, सुनिता राजेश वाघेरे, उप आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रिय अधिकारी शितल वाकडे, माजी सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, माहिती व जनसंपर्क विभागाचे वसीम कुरेशी, देवेंद्र मोरे, अभिजीत डोळस यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group