पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा कला विकास प्रकल्पाच्या खेळाडू दत्तक योजने अंतर्गत महापालिका संघातील थेरगाव माध्यमिक विद्यालयातील आजी-माजी विद्यार्थीनीच्या कबड्डी संघास माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने ट्रॅकसूट व कबड्डी साहित्य भेट म्हणून देण्यात आले.

सतेज कबड्डी संघ बाणेर आयोजित दि. १८ जुलै ते २३ जुले यादरम्यान “सतेज करंडक” या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी क्रीडा, कला, विकास प्रकल्पच्या विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत. यामध्ये कु.कोमल राठोड, निकिता माळी, रुपाली डोंगरे, भूमिका गोरे, पूजा तेलंग, विद्या गायकवाड, सिफा वस्ताद, सविता गवई, मनिषा राठोड, रेखा राठोड, किर्ती कडचंगी, प्रतिक्षा लांडगे या महिला खेळाडू व दोन पर्यवेक्षक यांना कबड्डी साहित्य व ट्रॅकसूट भेट देण्यात आले.
विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी किडे न बनता क्रीडा संगीत अभिनयाची आवड जोपासत केवळ राज्यातच नव्हे तर देश पातळीवर आपले न आपल्या शहराचे नाव उज्वल करावे असे मनोगत वाघेरे यांनी विद्यार्थ्यांनी बोलताना व्यक्त केले.

























Join Our Whatsapp Group