मावळ (Pclive7.com):- मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर सध्या वाढला असल्याने धरणात आज शुक्रवार (दि.२१) सकाळी सहा वाजेपर्यत ५१.३४ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या चोवीस तासात धरण परिसरात ४० मिमी पाऊस झाला असून पाणीसाठ्यात ३.०७ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यत पवना धरणात ७१.२१ टक्के इतका पाणीसाठा होता.

यावर्षी जून महिना तसा कोरडाच गेला. जुलै महिन्याच्या सुरूवातीला काही काळ पाऊस झाल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला होता. त्यानंतर या आठवडाभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पवना धरण क्षेत्रात यावर्षी आजपर्यत केवळ १११० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मे महिन्याच्या अखेरीस पवना धरणातील पाणीसाठा १७.९ टक्क्यावर आला होता. पावसाला जोर मिळत नसल्याने पिंपरी चिंचवड भागात ऐन पावसाळ्यात पाणी कपात करण्याची शक्यता निर्माण झालेली असताना पावसाचे पुर्नरागमन सर्वांसाठी दिलासादायक ठरले आहे.
१ जुन पासून पवना धरणाच्या पाणीसाठ्यात ३३.४४ टक्के वाढ झाली आहे. पवना धरणात ५१.३४ टक्के पाणीसाठा झाल्याने तुर्तास तरी पिंपरी चिंचवडकरांचे पाणी कपातीचे विघ्न दूर झाले असले तरी पुढील काळात धरण परिसरात चांगला पाऊस होणे गरजेचे आहे.
Tags: दिलासादायक : पवना धरण निम्मे भरलेधरणात ५१.३४ टक्के पाणीसाठा..!पवना धरणपाणीसाठापिंपरी चिंचवडमावळ





















Join Our Whatsapp Group