पिंपरी (Pclive7.com):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याला पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस, यांसह अन्य संघटनांच्या प्रतिनिधींनी विरोध दर्शविला असून, पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन आणि घोषणाबाजी करण्यात येत आहे. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीसांकडून आंदोलन करणाऱ्या काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौर्यावर येत आहेत. ते श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. त्यानंतर त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यानंतर दुपारी मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केले जाणार आहे. मात्र त्यांच्या दौऱ्याला काँग्रेसकडून विरोध होत आहे.

मात्र, मोदींच्या पुणे दौऱ्यावेळी आंदोलन करण्यात येऊ, यासाठी पिंपरी चिंचवड पोलीसांकडून अनेकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र तरी देखील विरोध आंदोलनावर ठाम आहेत. निषेध आणि घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून कऱण्यात येत आहे. त्यामुळे पोलीसांकडून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येतील काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्यासह अनेकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.





















Join Our Whatsapp Group