पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी ते शिवाजीनगर पर्यंत मेट्रो सुरु झाली असून नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. मेट्रो प्रवाशांना स्टेशन ते अंतर्गत एरियामध्ये जाण्यासाठी End टू End कनेक्टिव्हिटी मिळावे अशी शासनाची भूमिका असून यासाठी “शेअर रिक्षा” सुरू करण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने स्वागत करण्यात आले असून, मेट्रो स्टेशन ते अंतर्गत विभागांमध्ये शेअर रिक्षाचा सर्वे करण्यात आला असून या सेवेमध्ये रिक्षा चालकांनी सहभागी होऊन आपला व्यवसाय अधिक वृद्धिगत करावा तसेच प्रवाशांना पण चांगले सेवा द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले आहे.

यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अतुल अदे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर भोसेकर, संजय शिरसाठ, प्रकाश मुळे, विद्या गुरावे, वाहतूक विभागाचे, सतिश नांदुरकर ,अर्जुन पवार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संतोष कुदळे, मेट्रोचे मनोजकुमार डानेल, महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली खालील रिक्षा चालक स्वतःची रिक्षा घेऊन सर्वेसाठी सहभागी झाले होते.लक्ष्मण शेलार, रवींद्र लंके, अजय साळवे, मनोज राऊत, प्रमोद नांगरे, दत्ता रितापुरे, सुधीर पांचाळ, ग्राहक पंचायतचे श्रीकांत जोशी, प्रसन्न पोरे यांच्यासह मेट्रो, प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, रिक्षा संघटना व प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते.

या ठिकाणी झाला सर्व्हे..
“पिंपरी ते चिखली पिंपरी ते कुदरवाडी, पिंपरी ते घरकुल, पिंपरी ते निगडी, पिंपरी ते काळेवाडी पिंपरी ते पिंपरी गाव, संत तुकाराम नगर ते डी वाय पाटील, वायसीएम, “संत तुकाराम नगर ते यशवंत नगर, नेहरूनगर, संत तुकाराम नगर ते पिंपरी गाव, कासारवाडी नाशिक फाटा ते भोसरी,नाशिक फाटा ते इंद्रायणी नगर, नाशिक फाटा ते एमआयडीसी, नाशिक फाटा ते पिंपळे गुरव, नाशिक फाटा ते कोकणे चौक-शिवहार चौक, नाशिक फाटा ते सांगवी नवी सांगवी जुनी सांगवी, “फुगेवाडी ते सांगवी-नवी सांगवी- जुनी सांगवी, दापोडी ते नवी सांगवी जुनी सांगवी दापोडी ते बोपखेल दापोडी ते खडकी आधी मार्गावरती पथक तैनात करून रिक्षा मीटर टाकून रिक्षा मीटर प्रमाणे किती पैसे होतात याची निश्चिती करण्यात आली. लवकरच याबद्दलचा अहवाल प्रशासनाच्या वतीने मंजुरीसाठी ठेवण्यात येऊन त्यास मंजुरी देण्यात येईल.
यावेळी बाबा कांबळे म्हणाले, काही संघटनाने शेअर रिक्षाला विरोध केला आहे, मुळात हा विरोध चुकीचा असून यामुळे रिक्षा चालकांचे व प्रवाशांचे देखील नुकसान होणार आहे. शेअर रिक्षा भारतासह परदेशात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेल्या एक पर्याय असून टॅक्सी मध्ये देखील आता शेअर पद्धत वापरले जात आहे. शेअर पद्धतीमुळे कमी पैशांमध्ये सुरक्षित प्रवास केला जाऊ शकतो हा पर्याय अत्यंत चांगला असून, महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने यापूर्वी देखील पिंपरी चिंचवड शहरांमध्ये सोळा रस्त्यांना शेअर रिक्षा मार्ग ठरवण्यात आले होते. त्याचा फायदा पिंपरी चिंचवड शहरातील कामगार कष्टकरी वर्गांना होत आहे व यामुळे रिक्षा चालकांचे उत्पन्न वाढले आहे.
यामुळे शेअर ए रिक्षा हा मेट्रो स्टेशन ते लास्ट कनेक्टिव्हिटी साठी प्रवासी व रिक्षा चालकांसाठी देखील उत्तम असा पर्याय आहे, तीन प्रवाशांनी एकत्र येऊन मीटरने रिक्षा प्रवास करायचा त्यात तीस टक्के अधिक भाडं त्यांना मिळेल असा हा शेअर रिक्षाचा प्रस्ताव आहे, या योजनेत महाराष्ट्र रिक्षा पंचायत व त्यांच्या सर्व रिक्षा चालक-मालक पूर्णपणे सहभागी होणार आहेत, यामुळे जे कोणी विरोध करत आहेत त्याचा काही उपयोग होणार नाही उलट त्यांनी केलेल्या विरोधामुळे रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसानच होणार आहे, आता मेट्रो पासून अंतर्गत ठिकाणी प्रवास करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे तसेच मेट्रो कडे देखील टू व्हीलर ई रिक्षा व इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत याचा विचार विरोध करणाऱ्या रिक्षा संघटनांनी करावा विरोधकेल्यास रिक्षा चालक व प्रवाशांना नुकसानदायक होईल असे देखील बाबा कांबळे म्हणाले.

























Join Our Whatsapp Group