पुणे (Pclive7.com):- भरधाव लॅम्बोर्गिनी कारने एका भटक्या श्वानाला धडक दिल्याने श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली हे. हा अपघात पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकात सोमवारी (दि.७) घडला आहे. या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कार चालकाविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका ५७ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका भरधाव लेम्बोर्गिनी कारने गोखले चौकात असलेल्या एका श्वानाला जोरदार धडक दिली. या अपघातात श्वानाचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पळून गेला.
घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या ५७ वर्षीय महिलेने पोलिसांकडे धाव घेत सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर डेक्कन पोलीसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास डेक्कन पोलीस करत आहेत.






















Join Our Whatsapp Group