पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील संदीप वाघेरे युवामंचच्या वतीने माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२६ व २७ ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लोकमान्य हॉस्पिटल (चिंचवड), रुबी एलकेअर सर्व्हिसेस प्रा. लि,वायसीएम हॉस्पिटल, लोकमान्य कॅन्सर व आयुर्वेदिक हॉस्पिटल, चाकणे हॉस्पिटल, जिजामाता हॉस्पिटल, स्टार हॉस्पिटल, डी,वाय.पाटील हॉस्पिटल, स्पर्श हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले. महाआरोग्य शिबिरामध्ये एकूण १३७२ नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या नागरिकांवर रुग्णालयांच्या सहकार्यातून मोफत उपचार केले जाणार आहेत.
दिनांक २८ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीर व प्रभागामध्ये वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. जिजामाता रुग्णालयातील जेष्ठ वैद्यकीय अधिकार डॉक्टर सौ.साळवे मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करुण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. तसेच वाय.सी.एम रुग्णालय रक्तपेढी व स्टार हॉस्पिटल रक्तपेढी यांचे रक्तदान शिबिरास सहकार्य लाभले. एकूण १०५ रक्तदात्यांनी शिबिरामध्ये सहभाग घेतला. तसेच लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त माजी महापौर नितीन काळजे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, शत्रुघ्न काटे, हर्षल ढोरे, समीर मासुळकर, निलेश बारणे, निर्मलाताई कुटे, नवनाथ जगताप, तुषार हिंगे, शितल शिंदे, शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले, पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, सामाजिक कार्यकर्ते बाळाआप्पा वाघेरे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन संदीप वाघेरे युवामंचचे अध्यक्ष हरीष वाघेरे, सचिन वाघेरे, गणेश मंजाळ, विठ्ठल जाधव, रोहन वाधवानी, शुभम वाघेरे, शुभम शिंदे, रंजनाताई जाधव, विश्वास घुले यांनी केले होते.