पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील पूर्णानगर भागातील हार्डवेअरच्या दुकानाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ह्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

सदर कुटुंब हे राजस्थान मधील पाली जिल्ह्यातील आहे. चिमणाराम बेणाराम चौधरी (वय ४८), नम्रता चिमणाराम चौधरी (वय ४०), भावेश चिमणाराम चौधरी (वय १५), सचिन चिमणाराम चौधरी (वय १३) यांचा ह्या आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला आहे.

पहाटेच्या सुमारास पूर्णानगर मधील सचिन हार्डवेअरला ही आग लागली होती. याच हार्डवेअरमध्ये चौधरी कुटुंब हे वास्तव्यास होते. ही आग इतकी भीषण होती की ह्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
शॉटसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली असून कुलिंगचे काम सुरू आहे.






















Join Our Whatsapp Group