पिंपरी (Pclive7.com):- दापोडी येथे रोहितराज युवा प्रतिष्ठान आयोजित अखिल दापोडी गावठाण दहीहंडी उत्सव २०२३ मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. उत्सवाचे हे यंदाचे २१ वर्ष होते.

यावर्षी दहीहंडी उत्सवाचे खास आकर्षण होते सिने अभिनेत्री राशी खन्ना, मृनमयी देशपांडे, शिवानी रांगोळे, तीतीक्षा तावडे, अक्षय कुंजीर हे होते. तसेच लवकरच महाराष्ट्र भर प्रदर्शित होणाऱ्या रांगडा या मराठी चित्रपटाची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती.

यावेळी लहान मुलांच्या ग्रुप डान्सचे सादरीकरण करण्यात आले. गावातील सर्व जेष्ठ मंडळी, बंधू भगिनी व तरुण वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते. ७ थर लावून वाळकेश्वर गोविंदा पथक मुंबई यांनी दहीहंडी फोडली. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन माजी नगरसेवक रोहित आप्पा काटे यांनी केले होते. 

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शाम लांडे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, प्रसाद शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group