पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीत गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या सतीश काळे यांनी उपोषण सोडले आहे. काळे यांची प्रकृती खालावली होती. पोलीस प्रशासनाचे अधिकारी नाईकवाडे, मानव कांबळे, यांच्या हस्ते हे उपोषण सोडण्यात आले.
मराठा समाजास आरक्षण मिळावे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतिश काळे व सहकारी पिंपरीतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उपोषणास बसले आहेत. सतीश काळे हे गेल्या तीन दिवसपासून आमरण उपोषण करत आहेत. परंतु आज त्यांची तब्येत खालावली असून डॉक्टरांनी त्यांना ऍडमिट करण्यासाठी सांगितले होते.
या ठिकाणी समन्वय समितीची सर्व टीम उपस्थित झाली आहे. सर्वांच्या एक मताने निर्णय घेण्यात आला की, सतीश काळे यांनी उपोषण सोडावे. कारण आपला एक एक कार्यकर्ता आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. उपोषण सोडल्यानंतर लगेच त्यांना वायसीएम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात येणार आहे.
वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार आमरण उपोषणकर्ते सतीश काळे यांची तब्येत खालावल्याने त्यांचे उपोषण सोडण्यात आले. याप्रसंगी प्रकाश जाधव, कैलास कदम, मारुती भापकर, सचिन चिखले, जीवन बोराडे, सागर तापकीर, नकुल भोईर, युवराज दाखले, गणेश सरकटे, केदरे सर, राजेंद्र नायर, राजेंद्र पाटील, रवी सोळंके, भावेश काच्या, शाम पाटील आदी उपस्थित होते.