राजेश चोरगे (वय ३०, रा. बोराटे चाळ, सागर कॉलनी, कोथरूड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ५३ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटुंब मूळचे नेपाळ येथील राहणारे आहे. ते कामानिमित्त पुण्यात राहतात. आरोपी हा त्या कुटुंबाच्या ओळखीचा आहे. फिर्यादी यांची चार वर्षांची नात घरामध्ये खेळत असताना चोरगे तेथे आला. तो पीडित मुली सोबत खेळत होता आणि ‘तिला तुला खाऊ देतो बाहेर चल’ असे सांगत होता. परंतु, फिर्यादी यांनी या मुलीला कुठेही घेऊन जाऊ नका असे खडसावून सांगितले होते. तरी देखील त्यांचे लक्ष चुकवून आरोपीने या मुलीला शांतीबन चौकात नेले.
रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या बसच्या खाली या मुलीला तो घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिचा जोरजोरात रडण्याचा आवाज येऊ लागल्यानंतर तेथे जमा झालेल्या लोकांनी या दोघांनाही बस खालून बाहेर काढले. त्याला बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.