पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसने तुषार कामठे या तरुण चेहऱ्याला शहराध्यक्ष पदाची संधी दिली आणि हा तरुण पायाला भिंगरी लावून पक्ष वाढीसाठी पळत आहे. दरम्यान गणेशोत्सवाचे औचित्य साधून आमदार रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळाना भेटी गाठीचा दौरा केला. गणपती मंडळाच्या दर्शनासाठी रोहितदादा पवार चक्क दुचाकीवर स्वार झाले आणि पावसाची तमा न बाळगता गर्दीच्या गांधी पेठ आणि लिंक रोडवरच्या मंडळाना भेटी दिल्या.

या भेटीगाठी पहाटे ३ वाजेपर्यंत सुरु होत्या. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छेने ढोल ताशा न वाजवता फुलांच्या पायघड्या घालून रोहित पवार यांचे स्वागत केले. मंडळाना भेट देणार म्हणून अनेक मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जागे होते. रोहित पवार यांनी पिंपरी येथील सुखवानी गृहनिर्माण संस्था तसेच पुनावळे येथील अनेक गृहनिर्माण संस्थांच्या भेटी घेउन नियोजित कचरा डेपो बाबतीत चर्चा केली. काल शहरभर फिरताना रोहित पवार यांनी एकाही कार्यकर्त्याला नाराज न करता सर्व मंडळाना पहाटे ३ वाजेपर्यंत भेटी दिल्या. या सर्वात महिलावर्ग सुद्धा मागे नव्हता. रोहित पवार यांचा चाहता वर्ग या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहराने पाहिला. शहराला एक नवीन युथ आयकॉन आणि नवीन आपला दादा मिळाल्याची भावना युवकांमध्ये दिसत होती. यावेळी आमदार रोहित पवार यांनी शहरातील अनेक जेष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. येत्या काळात रोहित पवार, तुषार कामठे आणि प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे हे युवा आणि जेष्ठ यांची सांगड घालून नवीन बदलच्या दिशेने पाऊल टाकत आहेत अशी चर्चा शहरभर होत आहे.
यावेळी रोहित पवार यांनी अनेक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत सेल्फी काढली. कुणी मॅगी बनवली होती ती खाल्ली, कुणी केक आणले होते ते कापले, कुणी मसाला दूध दिले त्यांचा त्यांनी हसत स्वीकार केला. रोहित पवार आणि अध्यक्ष तुषार कामठे यांनी या दौऱ्यात गणेशाची मनोभावे दर्शन घेउन शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी गणरायाचे आशीर्वाद मागितले.
रोहित पवार यांनी चिंचवड मधील नवं तरुण मंडळ, सोनिगरा निलय हाऊसिंग सोसायटी, गांधीपेठ मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळ, काळभैरवनाथ मित्र मंडळ, अखिल भाजी मंडई मित्र मंडळ, संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ आणि पागेची तालीम मित्र मंडळ तसेच शहरातील श्री विठ्ठल तरुण मंडळ, सम्राट मित्र मंडळ, सहयोग मित्र मंडळ, हनुमान मित्र मंडळ, शिवराय मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, चैत्रबन, नवयुग, बारामती मित्र मंडळ, संत तुकाराम मित्र मंडळ, पवनानगर मित्र मंडळ क्रांती क्रीडा मंडळ, सहयोग मित्र मंडळ, क्रांती मित्र मंडळ, ज्योती मित्र मंडळ, मित्र सहकार्य तरुण मंडळ, साधू वास वाणी मंडळ, शिवसम्राज्य मंडळ, भाट मित्र मंडळ समता नगर मित्र मंडळ, सत्ता प्रतिष्ठान, शिवराया मित्र मंडळ, शिव प्रतिष्ठान मराठा युवा प्रतिष्ठान, आझाद मित्र मंडळ, श्री समर्थ तरुण मंडळ, नानापेठ तरुण मंडळ, स्वराज्य प्रतिष्ठान, शिव साम्राज्य मित्र मंडळ, ओम मित्र मंडळ, शिवसम्राज्य प्रतिष्ठान आदी मंडळाचे दर्शन घेतले.
यावेळी सुलक्षणाताई शिलवंत, गणेश भोंडवे, इम्रान शेख, ज्योती निंबाळकर, काशिनाथ जगताप, देवेंद्र तायडे, राजन नायर, मयूर जाधव, विशाल जाधव, प्रशांत सपकाळ, सागर चिंचवडे, निलेश पुजारी, रोहिणी वारे, राजू खंडागळे, राहुल धनवे आणि मुख्य प्रवक्ते माधव पाटील सोबत होते.