पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सव निमित्ताने आमदार पै. महेशदादा लांडगे युवा मंच व दिनेश लालचंद यादव मित्र परिवार यांच्या वतीने व आकुर्डी हाॅस्पीटल यांच्या सहकार्याने आज (दि.२७) रोजी बुधवारी कुदळवाडी महापालिका शाळा येथे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप करण्यात आले.

वेळच्यावेळी आरोग्याची तपासणी करणे काळजी गरज आहे. मात्र महागाईच्या काळात तपासणीसाठी लागणारा खर्च सामान्य माणसाला परवडणारा नाही. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक बांधीलकी जपत दिनेश यादव मित्र परिवारच्या वतीने व आकुर्डी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून कुदळवाडी मनपा शाळा येथे सर्व वयोगटातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराच्या माध्यमातून सुमारे २०० नागरिकांनी रक्तदाब, वजन, शुगर, एचबी, सीबीसी, डब्ल्यू बीसी थायरॉईड, ईसीजी, हृदयरोग व स्त्रियांचे विकार, दातांची व डोळ्यांची तपासणी करून मोफत सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. अनेक रुग्णाला आजारावर तपासणी दरम्यान आकुर्डी हाॅस्पीटल येथे पाठविण्यात आले.






















Join Our Whatsapp Group