पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी अत्यंत हृदय द्रावक घटना मोशी येथे घडली आहे. गुरुवारी (दि.२८) सायंकाळी विसर्जन सुरू असताना सोसायटीतील पाण्याच्या टाकीत पडून एका पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आरव आशिष पाटील (वय ५, रा. मंत्रा सोसायटी, मोशी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळूहळू व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोशी येथे मंत्रा सोसायटीमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. दरम्यान सोसायटीतील पाण्याच्या टाकीमध्ये पडून या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.




















Join Our Whatsapp Group