पिंपरी (Pclive7.com):- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पिंपरी चिंचवड मधील मराठा क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. निष्क्रिय मृत सरकारचा मराठा बांधव उद्या (दि.३१) रोजी सकाळी ११ वाजता चिंचवडमधील मोरया गोसावी समाधी घाट येथे दशक्रिया विधी करणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

सतीश काळे यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी 30 दिवसाची वेळ घेतली होती. परंतु आज 47 दिवस झाले तरी आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. गेल्या सहा दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे. जर त्यांच्या आरोग्यास काही झाले तर मराठा समाज गप्प बसणार नाही आणि सरकारला हे आंदोलन परवडणार देखील नाही.
सध्या राज्यात दररोज पाच ते सहा मराठा बांधव आत्महत्या करत आहेत. तरीही या मृत पावलेल्या शासनाला जाग येत नाही. म्हणून या शासनाला जाग करण्यासाठी मुर्दाड निष्क्रिय शासनाचा निषेध म्हणून दशक्रिया ( दहावा ) करुन निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलन मंगळवार दि.३१ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता मोरया गोसावी दशक्रिया विधी घाट चिंचवड येथे होणार आहे असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी दिली आहे.





















Join Our Whatsapp Group