पिंपरी (Pclive7.com):- राज्यातल्या अनेक भागांप्रमाणे पिंपरी चिंचवडला ही आज सायंकाळी आठच्या सुमाराला अवकाळी पावसाने झोडपले. शहराच्या अनेक भागात आज पावसाने मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार हजेरी लावली. अचानक झालेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.

हवामान विभागाने दोन ते तीन दिवस पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला होता. आज सकाळपासूनच पिंपरी चिंचवड शहरात पावसाचे वातावरण होते. दरम्यान सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.

























Join Our Whatsapp Group