पिंपरी (Pclive7.com):- वाकड प्रीमियर लीग-पर्व ७ या क्रिकेट सामन्यांचा चषक अनावरण सोहळा आमदार अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप व भाजपा शहराध्यक्ष, शंकरशेठ जगताप यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.

विनायक गायकवाड युथ फाउंडेशन आयोजित वाकड प्रीमियर लीग या क्रिकेट सामन्यांचे यंदा सातवे वर्ष आहे. या क्रिकेट सामन्यांसाठी वाकड, पिंपळे निलख, ताथवडे, पुनावळे या भागातील बहुसंख्य सोसायटी सभासद भाग घेत असतात. विनायक गायकवाड युथ फाउंडेशनच्या वतीने फक्त सोसायटी सभासदांसाठी हे क्रिकेट सामने आयोजित केले जातात. या सामन्यांसाठी २०० पेक्षा अधिक सोसायटी भाग घेत असतात. त्यामुळे अत्यंत चुरस या सामन्यांमध्ये पाहायला मिळते.
यावेळी विनायक गायकवाड म्हणाले “वाकड प्रीमियर लीग हि संकल्पना लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रेरणेने २०१७ साली सुरु झालेली आणि पुढे देखील भाऊंच्या स्मरणार्थ वाकड प्रीमियर लीग ह्या स्पर्धा समर्पित असणार आहेत.”
वाकड प्रीमियर लीग-पर्व ७ या सामन्यांची सुरुवात लवकरच होत असून, या सामन्यांसाठी बहुसंख्य सोसायटी सभासदांनी सहभाग नोंदविलेला आहे.
Tags: चषक अनावरण सोहळापर्व ७वाकड प्रीमियर लीगवाकड प्रीमियर लीग-पर्व ७ चे चषक अनावरण सोहळाविनायक गायकवाड युथ फाउंडेशन























Join Our Whatsapp Group