पिंपरी (Pclive7.com):- प्रयत्न सोशल फाऊंडेशन आयोजित भव्य किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला. प्राधिकरण येथील संत तुकाराम महाराज उद्यान या ठिकाणी रविवार दि.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्ष कु.अजय अनिलराव मोरे यांनी प्रमुख पाहुणे ‘शेर शिवराज आणि सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते प्रद्योतजी पेंढारकर आणि लोकमान्य हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर जयवंतजी श्रीखंडे तसेच शिवव्याख्याते नरेंद्रजी पेंडसे यांचे स्वागत व सत्कार केला. त्यानंतर फाऊंडेशनच्या माहिती पुस्तकाचे प्रकाशन केले.

यावेळी माजी नगरसेवक अमित गावडे, अतुल इनामदार, माजी नगरसेविका शर्मिलाताई बाबर, सरिताताई साने, कैलास जायगुडे, अनिल मोरे, नवनाथ साखोरे उपस्थित होते. किल्ले बनवा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या १२७ गटांपैकी दहा उत्कृष्ट गटांना पारितोषिक देण्यात आली. तसेच तृतीय क्रमांक आदित्य पटवर्धन (राजमुद्रा ग्रुप, रायगड) द्वितीय क्रमांक आदित्य वाडकर (टिळक मित्र मंडळ, विशाळगड) प्रथम क्रमांक तन्मय खांबे (कोरोमंट गणेश मित्र मंडळ, राजगड) अशा सर्व विजेत्यांना या वेळी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
फाऊंडेशनचे सचिव राजीव मेनेन यांनी पुढील वर्षातील नियोजित कार्याची माहिती दिली. शेवटी फाऊंडेशनचे उत्सव/कार्यक्रम प्रमुख जयेश मोरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व शिववंदनने कार्यक्रमाची सांगता झाली.
स्पर्धेचे परीक्षण कौशल जायगुडे (उपाध्यक्ष), ऋषिकेश कांबळे (कार्याध्यक्ष), ओम महांगरे (खजिनदार) यांनी केले. सूत्रसंचालन पार्थ देशपांडे यांनी केले. आदित्य भोईटे, यश गायकवाड, अनुराग पाटील, ओम शेंडे, शंतनु चौधरी, साहिल कांबळे, यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली.























Join Our Whatsapp Group