पिंपरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस मतदार संघातील प्रभागांमध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यातच कृष्णा नगर मधील सामाजिक महिला कार्यकर्त्या कीर्ती जाधव आणि मारुती गणपत जाधव यांच्यावतीने २५०० गाईंना चारा वाटप व वाय.सी.एम हॉस्पिटल मधील रुग्णांना फळ वाटप करत वाढदिवस साजरा केला.

महेश दादांच्या सलोख्याशी व दादांची गोरक्षक म्हणून एक ओळख निर्माण झालेली असताना ग्रामीण भागातील गाई, बैल, घोडा यांच्याशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. तसेच गोमातेचे रक्षण. दादांच्या विचारांशी अनुसरून एक स्तुत्य उपक्रम घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन दक्षता समिती प्रमुख गोरक्षक श्री. शिवशंकर स्वामी हे देखील आवर्जून उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत वाय.सी.एम हॉस्पिटल मधील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. त्यासाठी प्रमुख उपस्थित म्हणून वाय.सी.एम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group