पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका पौर्णिमा रविंद्र सोनवणे (वय ४४) यांचे आज (सोमवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा असा परिवार आहे.

तळवडे, रुपीनगर भागातून २०१२ आणि २०१७ मध्ये दोनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून पौर्णिमा सोनवणे या महापालिकेवर निवडून आल्या होत्या. स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Tags: पौर्णिमा सोनवणे
























Join Our Whatsapp Group