पिंपरी (Pclive7.com):- आपला आदर्श.. आपली प्रेरणा.. नवं भारत निर्माण संकल्पक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीवर आधारित कार्य, कर्तव्य, विकास, नव संकल्पना, शासन, प्रशासन व दूरदृष्टी नियोजनावर आधारित महाराष्ट्रातील नामांकित मराठी वृत्तपत्रातील छायाचित्र व माहितीच “पंतप्रधान ते प्रधानसेवक नरेंद्र मोदी” प्रदर्शनाचे आयोजन कलारंग सांस्कृतिक कलासंस्था, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह कलादालन, पुणे-३३ येथे दि.५,६, ७ जानेवारी २०२४ तीन दिवस करण्यात आले असल्याची माहिती आयोजक अमित गोरखे यांनी दिली आहे.

“पंतप्रधान ते प्रधानसेवक” नरेंद्र मोदी प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते दि.०५ रोजी सकाळी १०.३० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह कलादालन येथे करण्यात येणार आहे. या प्रदर्शनासाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, पिंपरी चिंचवड भाजपा प्रभारी वर्षा डहाळे, माजी खासदार अमर साबळे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, माजी राज्यमंत्री सचिन पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आयोजक अमित गोरखे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकार म्हटले आहे की, नरेंद्र मोदी हे सिहां सारखी हिंम्मत आणि पहाडा एवढी स्वप्ने घेऊन एका परीपूर्ण भारताची उभारणी करणारा नेता, नेता नव्हे प्रधानसेवक. त्यांच्या नि:स्वार्थी देशसेवेला पाठींबा देण्यासाठी सन्मान पंतप्रधान पदाचा.. गौरव प्रधानसेवक कार्याचा.. नवा वर्ष नमो वर्ष २०२४ संकल्पना आपण पिंपरी चिंचवड महानगरात राबवित आहोत.
लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता वृत्तपत्रातून प्रकाशित छायाचित्र व बातम्यांच्या संकलनातून आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशन गोवा येथील दि.१३ सप्टेंबर २०१३ ते आज पर्यंतच्या प्रकाशित बातम्यांचे वॉल पोस्टर्स व संकलित पुस्तकातून आम्ही भारतीय नागरिकांपुढे प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढे आणत आहोत. जवळपास १० वर्षांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार “पंतप्रधान ते प्रधानसेवक” नरेंद्र मोदीजी प्रदर्शनाचे स्वागताध्यक्ष तथा निमंत्रक अमित गोरखे प्रदर्शनाचे संयोजक नितीन चिलवंत व शिवकुमार सिंह बैस असणार आहेत.
Tags: अमित गोरखेचिंचवडनरेंद्र मोदीपंतप्रधान ते प्रधानसेवकमराठी वृत्तपत्रातील छायाचित्र व माहिती प्रदर्शन






















Join Our Whatsapp Group