पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी प्रशांत महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि.६) प्रशांत महाजन यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष यश साने, माजी महापौर योगेश बहल, माजी वैशाली घोडेकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, कार्याध्यक्ष शाम अण्णा लांडे, प्रशांत शितोळे, माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले, फजल शेख, प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, सरचिटणीस संजय उदावंत, यांच्यासह जेष्ठ नेते, नगरसेवक, नवनियुक्त पदाधिकारी आदी उपस्थित होते.
नियुक्तीनंतर प्रशांत महाजन म्हणाले की, हे केवळ पद नसून पक्षाने माझ्या कार्यक्षमतेवर दाखवलेला दृढ विश्वास आहे. आणि तो योग्य असल्याचे मी माझ्या कामातून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हणे यांच्या नेतृत्वात पक्ष संघटन वाढीकरिता जबाबदारीने आणि पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन.
तसेच आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पिंपरी विधानसभा मतदारसंघात पक्षाची ध्येय-धोरणे आणि अजितदादांनी केलेला शहराचा विकास हे घरोघरी पोहचविण्याचे काम करण्याची ग्वाही प्रशांत महाजन यांनी दिली.
Tags: अजित पवारउपाध्यक्ष पदी निवडपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसप्रशांत महाजनराष्ट्रवादी काँग्रेस
























Join Our Whatsapp Group