पिंपरी (Pclive7.com):- गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक या चारही क्षेत्रामध्ये प्रगती बघितली आहे. संपूर्ण जगामध्ये मोदींच्या कार्य कर्तुत्वाचा गौरव होत आहे. एक न्यू इंडियाचा संकल्प घेऊन ते काम करत आहे. आणि हे खरं आहे जसे ‘M for मदर’ ती आई आपल्या मुलाचे नुकसान कधीच होऊन देत नाही, तसेच ‘M for मोदीजी’ आपल्या देशाचे कधीच नुकसान होऊ देणार नाहीत असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
चिंचवडमध्ये कलारंग सांस्कृतीक कलासंस्थाचे वतीने आयोजित ‘पंतप्रधान ते प्रधानसेवक’ नरेंन्द्र मोदी यांच्यासंदर्भात मराठी वृत्तपत्रातील छायाचित्र व माहितीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली, यावेळी ते बोलत होते.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अतिशय उत्तम असे हे प्रदर्शन आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये या देशामध्ये सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक,आर्थिक या चारही क्षेत्रामध्ये देशाने प्रगती बघितली आहे. जगामध्ये मोदीजींच्या कार्य कर्तुत्वाचा गौरव होत आहे. ५ ट्रिलियन डॉलर इकॉनोमीचा जो संकल्प आहे आणि त्या संकल्पासाठी होणारा प्रयत्न. या प्रयत्नाची माहिती या प्रदर्शनातून माध्यमातून सर्वसामान्य जनतेला पोहोचवण्याचे कार्य या प्रदर्शनातून केले आहे. ते अभिनंदनीय आणि कौतुकास्पद आहे. एक न्यू इंडियाचा संकल्प घेऊन मोदीजी काम करत आहे. आणि हे खरं आहे जसे ‘M for Mother’ ती आई आपल्या मुलाचे कधीच नुकसान होऊन देत नाही, तसेच M for मोदीजी आपल्या देशाचे कधीच नुकसान होऊ देणार नाहीत असे शेवटी बोलताना ते म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार यांनी तब्बल एक तास वेळ देऊन हे प्रदर्शन पूर्णपणे पाहिले. कलारंग संस्थेचे अध्यक्ष व मुख्य संयोजक अमित गोरखे व ज्यांनी १० वर्ष प्रत्येक बातमी संकलीत केली ते संयोजक नितीन चिलवंत यांचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुकास्पर आभार मानले. यावेळी आमदार उमा खापरे, शहराध्यक्ष शंकर जगताप, सदाशिव खाडे, माऊली थोरात, कैलास कुटे, राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, शीतल शिंदे, गणेश लंगोटे, मनीषा शिंदे, निलेश अष्टेकर, राजू बाबर, मदन गोयल आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने नागरिकांनी भेट दिली. अमित गोरखे यांनी स्वागत केले तर शिवकुमार बैस यांनी आभार मानले.