पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते युवासेना शहर संघटक पिंपरी चिंचवड शहर निलेश हाके यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेनेच्या राज्यव्यापी शिवसंकल्प अभियाना दरम्यान संपन्न झाले.
८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण. या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर चालत शहरात युवा सेनेच्या माध्यमातून शहर संघटक निलेश हाके यांच्यामार्फत अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे युवा सेनेच्या वतीने प्रभागामध्ये १० हजार दिनदर्शिकेचे वाटप करण्यात येणार आहे. याचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शक, आधारवड महासंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे देखील उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group