पिंपरी (Pclive7.com):- अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अपात्रता आमदारांच्या संदर्भातील निर्णय काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिकृतपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला. शिवसेना पक्षासाठी हा आनंदाचा व ऐतिहासिक क्षण आहे. एकमेकांना पेढे भरवत व फटाके फोडून घोषणा देत पिंपरी येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी चिंचवड शहर युवासेनेच्या वतीने आनंदोत्सव व जल्लोष साजरा करण्यात आला.
त्याप्रसंगी युवा सेना मावळ जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, युवा सेना शहर प्रमुख माऊली जगताप, युवा सेना शहर संघटक निलेश हाके, मंदार येळवंडे, चिंचवड विधानसभा युवासेना प्रमुख सागर पुंडे, पिंपरी विधानसभा युवा सेना प्रमुख अभिजीत पाटील, उपशहर प्रमुख नितीन पाटील, समन्वयक युवा सेना अविनाश जाधव, उपविधान सभा अधिकारी पिंपरी विधानसभा संदीप पाटील, विशाल माने, सचिन निकम, निखिल येवले, मयूर राजपूत, संजय रावत, ओंकार पुजारी, प्रशांत नखाते आदी उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group