पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष तसेच माजी नगरसेवक सचिन चिखले यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.
दरम्यान, सचिन चिखले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांमध्ये मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबिर यांचा समावेश होता. यावेळी विशेष तज्ज्ञांच्या उपस्थितीत योग्य सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या प्रक्रियेमध्ये तब्बल ६५० नागरिकांनी सहभाग घेतला. तसेच त्यांच्या तपासण्या यशस्वी रीतीने पार पाडण्यात आल्या.
तसेच मनविसेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव आशिष साबळे-पाटील, उपाध्यक्ष हेमंत डांगे, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले व मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष अनिकेत प्रभू यांच्या हस्ते मॉर्डन महाविद्यालय, यमुनानगर-निगडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रतीक शिंदे (उपशराध्यक्ष मनविसे), रोहित काळभोर (उपविभाग अध्यक्ष मनविसे), स्वप्निल महांगरे (प्रभाग अध्यक्ष), विपुल काळभोर, सोमनाथ काळभोर, निलेश पवार, रुपेश पाटील, नगरसेवक सचिन भाऊ चिखले युवा मंच,गणाध्यक्ष मित्र मंडळ निगडी गावठाण यांनी केले होते. यावेळी उत्कृष्ट कार्यक्रमांच्या आयोजन करून ते पार पाडणाऱ्या सर्वांचे आभार सचिन चिखले यांनी मानले.


























Join Our Whatsapp Group