पिंपरी (Pclive7.com):- अयोध्या राम नगरी येथे प्रभू श्रीराम जन्मभुमी प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. याचे औचित्य साधत भोसरी येथील सद्गुरुनगर येथे श्री गुरुदेव दत्त सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने दत्त मंदिरात रामरक्षा पठण, भजन, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. हा उत्सव सोहळा मोठ्या आनंदाच्या वातावरणात येथे साजरा झाला.
यावेळी प्रभू श्रीरामांची पालखी घेऊन नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. लहान मुलांना प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची वेशभूषेत त्यांची मिरवणूक ही काढण्यात आली. याप्रसंगी नागरिकांनी प्रभू श्री रामचंद्रांच्या घोषणानी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. प्रतिष्ठानच्या वतीने सद्गुरुनगर मधील नागरिकांना घरोघरी जाऊन अयोध्या येथील राम मंदीराची प्रतीकृती, पणतीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी भाविकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच परिसरातील नागरिकांना अयोध्या येथील सोहळा पाहता यावा यांचे साक्षीदार होता यावे, यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी एलईडी स्क्रीन द्वारे थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगरसेविका सारिका लांडगे, नगरसेवक रवी लांडगे तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष लांडगे व नगरसेवक राजेंद्र लांडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group