पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी एका जाहीर कार्यक्रमात त्यांची जीभ घसरली आहे. त्यांनी शरद पवार गटाच्या पदाधिकऱ्यांचा थेट बाप काढला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. मी भल्या सकाळी काम करतो तसं कोणता माय का लाल असं काम करतो ते दाखवा. पण तुमच्याच इथला की दीड शहाणा म्हणतो मी सकाळी सहा वाजता ठेकेदारांची कामं करायला उठतो. त्याला म्हणावं तुझ्या बापाने मला तसं करताना पाहिलं होतं का? राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी काल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर अजित पवारांवर अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना अजित पवारांची अशी जीभ घसरली आहे.
काय म्हणाले होते तुषार कामठे..?
“नेहमी अजित पवार म्हणतात पहाटे उठून कामाला लागतो. शहराचा विकास केलाय. त्या अजित पवार यांनी केवळ ठेकेदारांचा आणि त्यांच्या विचारांच्या लोकांचा विकास केलाय. ते पहाटे त्यांना भेटायला जायचे. पिंपरी- चिंचवड शहरात कोणी लक्ष दिलं तर त्यांना आवडत नसायचं. साधा फ्लेक्सवर फोटोवरून ते विचारणा करायचे” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केले होते.


























Join Our Whatsapp Group