पिंपरी (Pclive7.com):- जगदंब प्रतिष्ठान आयोजित जगदंब क्रिएशन, मुंबई व महाराजा शंभू छत्रपती प्रोडक्शन पुणे प्रस्तुत शिवपुत्र संभाजी महानाट्य चे आयोजन दिनांक 22 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत भोसरी येथे करण्यात आले आहे भोसरी येथील गाव जत्रा मैदान येथे रोज सायंकाळी सहा वाजता हे महानाट्य होणार आहे या महानाट्यकरिता प्रवेश विलामूल्य असणार आहे.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2024/02/IMG-20240215-WA0032-300x300.jpg)
शिवपुत्र संभाजी महानाट्य साठी स्थानिक कलाकारांना सहभागी होता येणार आहे. या महानाट्यात सहभागी होण्यासाठी (विशाल बोडखे +919766066006) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत असून ज्येष्ठ कलाकार राजन बाने औरंगजेबाची भूमिका निभावणार आहेत. सोबतच स्नेहलता वसईकर, महेश कोकाटे, विश्वजीत फडते, अजय तापकीरे आणि रमेश रोकडे आदी सिनेकलावंतांचा सहभाग या महानाट्यात असणार आहे. यासोबतच 150 हुन अधिक स्थानिक कलाकार या वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहेत.
तडाखेबाज संवाद,120 फुटी भव्यदिव्य किल्ल्याचा रंगमंच, खरी खुरी लढाई, हत्ती, घोडे आणि बैलगाड्यांचा वापर, 26 फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम, चित्तथरारक घोडेस्वारी, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर सोबत 150 पेक्षा जास्त कलाकारांचा सहभाग या महानाट्यात असणार आहे.