देहू (Pclive7.com):- इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ होत असून बुधवारी तीर्थक्षेत्र देहूगाव येथे विविध प्रकारचे मासे मृतावस्थेत आढळले. मृत माशांमध्ये गोल्डन, महाशिर, शिवडा असा प्रजातींचा समावेश असून त्यांची लांबी साधारण साडेतीन फूट आहे.
देहूगाव येथे इंद्रायणी नदीच्या काठावर बुधवारी नागरिक फिरायला गेले असता त्यांना कापूरवडा येथे मोठ्या संख्येने मासे मृतावस्थेत आढळले. इंद्रायणी नदीत वाम, मरळ, चीलापी असे मासे आजवर आढळत होते. मात्र या नदीत देवमाशांसारखे दुर्मिळ मासे देखील असल्याचे निदर्शनास आले आहे. मृत झालेल्या माशांमध्ये देवमासे देखील मरण पावले आहेत. इंद्रायणी नदी पात्रात ठिकठिकाणी जलपर्णी वाढली आहे. तिथे माशांना पाण्याच्या वरच्या भागात येता येत नाही. त्यामुळे मासे जलपर्णी कमी असलेल्या कापूरवडा परिसरात आले. मात्र ओढ्यातून शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने पाणी अत्यंत प्रदूषित झाले आहे. इंद्रायणी नदीच्या पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्याने मास्यांचा मृत्यू झाला आहे.
























Join Our Whatsapp Group