पिंपरी (Pclive7.com):- शिवतेज नगर येथील श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कर्तुत्वान महिलांचा सन्मान व प्रा. सौ. शैलजाताई सांगळे यांचे आनंदी जीवनाचा मार्ग या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजिका सौ. पुष्पाताई बोत्रे ह्या होत्या. प्रमुख उपस्थितीत सौ. तारामती बहिरवाडे, सौ मनीषा देव शोभा नलगे होत्या.
दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महिला मंडळाच्या कार्याध्यक्ष सौ. सारिका रिकामे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्या म्हणाल्या की, यावर्षीपासून महिला दिन साजरा करीत असताना, प्रतिकूल परिस्थितीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलेला कर्तुत्वान पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये अपंगासाठी काम करणाऱ्या सौ. संगीता जोशी, कार सेविका म्हणून सौ. सुनंदा सानप व आरोग्य विभागातील महिला कर्मचारी सौ. अनुसया वाघमारे आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आराध्या कोरे यांनी गणेश स्तवन व शिववंदना सादर केले. अंजली देव यांच्या ग्रुपने सुंदर समूह नृत्य सादर केले. पुनम दवडे अर्चना पाटील यांनी फॅशन शो सादर केला. सेवेकरी ग्रुप मधील, क्षमा काळे, अश्विनी केवडकर, छाया महाजन, केतकी वझे यांनी इतिहासातील कर्तृत्ववान महिलांची वेशभूषा करून सुंदर असं सादरीकरण केले. यामध्ये झाशीची राणी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, महिला डॉक्टर महिला वकील आदी वेशभूषा करून अभिनय केला. जेष्ठ नागरिक महिलांनी देखील आपली कला या ठिकाणी सादर केली. याचबरोबर अनेकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.
पुष्प बोत्रे यांनी अध्यक्ष भाषणात महिला मंडळाचा चांगल्या उपक्रमाबद्दल गौरव केला. कार्यक्रमाचे संयोजन महिला मंडळाच्या कार्याध्यक्ष सारिका रिकामे उपाध्यक्ष अंजली देव, क्षमा काळे, नीलिमा भंगाळे, गीतांजली पाटील, स्नेहल खडके, प्रीती झोपे, सविता राणे, मंगल काळे, मोहिनी शिराळकर, मनीषा भडांगे, सुनिता वायाळ, अर्चना पाटील, अश्विनी केवाडकर, केतकी वझे, कांचन नारखेडे, अश्विनी कोरे, नम्रता निरपळ, दिपाली योगी आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माही चौरे यांनी केले. कांचन नारखेडे यांनी आभार मानले. पंचक्रोशीतील महिलांनी कार्यक्रमासाठी खूप गर्दी केली होती.






















Join Our Whatsapp Group