नवी दिल्ली (Pclive7.com):- लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची पाचवी यादी जाहीर झाली आहे. या यादीत अभिनेत्री कंगनाला लोकसभेचं तिकिट देण्यात आलं आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून कंगना रणौत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहे. तसंच अरुण गोविल यांनाही तिकिट देण्यात आलं आहे. मेरठमधून अरुण गोविल निवडणूक लढणार आहेत. रामायण मालिकेत रामाची भूमिका करुन घराघरांत पोहचलेले अरुण गोविल हे मेरठमधून निवडणूक लढवणार आहेत.
कंगना रणौत ही बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री..
कंगना रणौत ही हिंदी सिनेसृष्टीतली सुप्रिसद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या कामाच्या बळावर स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूडची ‘क्वीन’ असं तिला संबोधलं जातं. कंगनाने आत्तापर्यंत अशी काही वक्तव्यंही केली आहेत ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना तिने मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यानंतर तिचं ऑफिस तोडण्यात आलं होतं. तसंच तिने त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका केली होती. आता कंगनाला लोकसभा निवडणुकीचं तिकिट जाहीर झालं आहे. भाजपाने लोकसभेसाठी त्यांची पाचवी यादी जाहीर केली आहे. त्या यादीत कंगना रणौतचं नाव आहे. भाजपाने कंगनाला तिकिट दिल्यानंतर कंगनाची प्रतिक्रियाही समोर आली आहे.























Join Our Whatsapp Group