पुणे (Pclive7.com):- महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एका ठिकाणी उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवसात पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होशाळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये महाराष्ट्रात 5 एप्रिलपासून पुढील 4 दिवस मेघगर्जनेचा इशारा दिला आहे.
एवढंच नव्हे तर या काळात तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज देखील वर्तवला आहे. शुक्रवारपासून हवेत आद्रता वाढलेली पाहायला मिळणार आहे. पाच ते आठ एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रात असं वातावरण असेल. तर सहा ते आठ एप्रिल या काळात कोकण, मराठवाड्यात आणि सात ते आठ एप्रिल दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात अक्षरशः सूर्य आग ओकत आहे. आतापर्यंत तापमानाची नोंद ही 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत नोंदवली आहे. पुढील काही दिवस उष्णतेची लाट येण्याचा देखील इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही जिल्ह्यात पारा हा 40 पार गेला आहे. अशातच हवामान खात्याकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. या आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये पाऊस पडणार आहे.
























Join Our Whatsapp Group