पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल डॉ. कैलास कदम यांचा उद्या रविवार (दि.०७) जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता हिंद कामगार संघटनेच्या खराळवाडी येथील कार्यालयासमोर हा कार्यक्रम होणार आहे.
देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे व आळंदी संस्थानचे अध्यक्ष, महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे उपाध्यक्ष ऍड राजेंद्र उमाप यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पद्मश्री सुभेदार पेटकर भूषविणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.























Join Our Whatsapp Group