पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील उदयमुख होतकरू कुस्ती खेळाडूंसाठी शिवसेना आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आपल्या आमदार निधीमधून ५ लाख रुपयांची अंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट प्रदान केली.
येथील राजा शिवछत्रपती कुस्ती प्रशिक्षण केंद्रांमध्ये हा कार्यक्रम झाला. केंद्राचे संस्थापक राजेश उर्फ पप्पू काळभोर यांच्या संयोजनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला आमदार गौतम चाबुकस्वार, माझी महापौर आझम पानसरे, नगरसेवक अमित गावडे, विलास यादव, अर्जुन पुरस्कार विजेते गोपाळ देवांग, ऑलम्पिकवीर मारुती आडकर, श्रीराम कोकणे, व्ही. एस. काळभोर, शंकरराव पांढरकर, धनंजय काळभोर, सचिन काळभोर, विठ्ठल काळभोर, राजेंद्र बाबर, संतोष माचुत्रे, भारत केसरी विजय गावडे, अमित बाबर, बाबा बुचडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षण केंद्रात दररोज सकाळ व संध्याकाळ या वेळात या मॅटवर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती या केंद्राचे प्रमुख व राष्ट्रीय खेळाडू पप्पू काळभोर यांनी यावेळी दिली. तर या मॅटचा वापर शहरातील अधिकाधिक तरुणांनी घ्यावा व शहराचे नाव क्रीडास्तरावर उंचवावे असे आवाहन आमदार चाबुकस्वार यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अक्षय मोरे, प्रास्ताविक पै. पप्पू काळभोर तर आभार पै. ज्ञानेश्वर कुटे यांनी मानले.
























Join Our Whatsapp Group