पिंपरी (Pclive7.com):- मोतीबिंदू आजाराने पीडित असणाऱ्या ३५ रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करणार असल्याचा संकल्प राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केला आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त दापोडी येथे शौर्य प्रतिष्ठाण,गैलक्सी डायनस्टिक क्लीनिक, विशाल वाळुंजकर युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे उदघाटन शौर्य प्रतिष्ठानचे खासदार साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार साबळे यांचे औक्षण करून व केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक माऊली थोरात, भाजपा पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष विजय शिनकर, ख्रिस्ती समाज विकास संघ अध्यक्ष दीपक चक्रनारायण, प्रा.मनोज वाखारे, संभाजी फुगे, RMC फाऊंडेशन अध्यक्ष रुपेश चांदेरे, सामाजिक कार्यकर्ते इमामभाई शेख, शौर्य प्रतिष्ठण सचिव नाना ढोकले, महिला अध्यक्षा जयश्री नवगिरे, भाजप युवा मोर्चा सचिव प्रथमेश पाठक,आम्ही समर्थ ग्रुप अध्यक्ष रवी क्षीरसागर, सुरज भोसले,गणेश भोकरे, निलेश निलेश सफेरा, भाजप प्रभाग अध्यक्ष धर्मेंद्र क्षीरसागर, सुधीर चव्हाण, नूतन जाधव, रवी शिंदे, निलेश आरडे,विनोद जगताप, अविनाश थोरात यांनी प्रमुख उपस्थिती लावली.
आरोग्य शिबीरामध्ये नेत्र चिकित्सा, अल्प दरात चष्मे वाटप, हाडांची ठिसुळता, मणका, सांधेदुकी, सर्व हाडांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात सुमारे ५०० रुग्णांनी तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला. यावेळी शिबिरात डॉ.ऋषिकेश पवार, डॉ.शीतल पवार, हॉस्पिटल व्यवस्थापक सी.के.काळे, अक्षय काटे या डॉक्टरांनी सहकार्य केले.
शौर्य प्रतिष्ठाणचे कार्य समाजासाठी कौतुकस्पद आहे. समाजहितासाठी नेहमी कार्य करीत राहवे, गोरगरीबांची सेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत प्रत्येकाने अंमलात आणले पाहिजे, असे आवाहन खासदार साबळे यांनी केले.
दरम्यान, तामीळनाडू येथे राष्ट्रीय चेस बॉक्ससिंग स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवल्या बद्दल बॉक्सर राहुल धोत्रे याचा सत्कार खासदार साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रभावती जगताप, शुभम शिवले,साहिल शेख, निलेश मंडलिक,गणेश जावीर, ओंकार जगताप यांनी काम पाहिले. कार्यक्रम सूत्रसंचालन प्रा.गोरख ब्राम्हणेसर व आभार शौर्य प्रतिष्ठण कार्यध्यक्ष विशाल सातपुते यांनी केले. या कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group