पिंपरी (Pclive7.com):- पैशांच्या वादातून मारहाण करणाऱ्या पुतण्या आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी देहूगाव माळवाडी येथे घडली. संभाजी शांताराम बाळसराफ (५६, रा. देहूगाव, माळवाडी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण शांताराम बाळसराफ, योगेश राजाराम बाळसराफ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी फिर्यादी बाळसराफ हे त्यांच्या शेतात ज्वारी राखत होते. तिथे त्यांचा पुतण्या योगेश आला. दोघांमध्ये कर्जाबाबत बोलणे सुरू होते. त्यावेळी बाळसराफ यांचा भाऊ बाळकृष्ण तिथे आला. त्याने शिवीगाळ करून बाळसराफ यांच्या पत्नीला मारहाण केली. त्यानंतर बाळसराफ आणि त्यांच्या पत्नी शेतातून पळून घरी जात असताना आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवून योगेश याने ‘तुला आज संपवून टाकणार आहे’ असे म्हणत त्यांना काठीने आणि दगडाने मारून खून करण्याचा प्रयत्न केला.
























Join Our Whatsapp Group