शिरूर (Pclive7.com):- महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी शिरुर मतदारसंघात पैसे वाटप होण्याची शक्यता असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वतीने निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून मतदारांना पैसे वाटप होण्याची शक्यता आहे.

तरी शिरूर मतदार संघातील पीडिसीसी बँक आणि प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ पतसंस्थेच्या सर्व शाखांबाहेर पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी अमोल कोल्हे यांनी या पत्रामध्ये केली आहे.
Tags: खासदार डॉ. अमोल कोल्हेनिवडणूक आयोगपैसे वाटप तक्रारराष्ट्रवादी काँग्रेसशिरूर लोकसभाशिवाजीराव आढळराव पाटील


























Join Our Whatsapp Group