आळंदी (Pclive7.com):- क्षेत्र आळंदी येथे लहान मुलांकरिता व अनाथ मुलांकरिता श्री भिमराव महाराज हांडे व सचिन महाराज जाधव यांच्या वतीने 1 मे ते 15 मे दरम्यानच्या कालावधीमध्ये उन्हाळी बालसंस्कार शिबिर संपन्न झाले. यामध्ये मुलांना श्रीमद् भगवद्गीता, पखवाज, हार्मोनियम, तबला, हरिपाठ, वारकरी चाली, शूर -वीरांची जीवन चरित्र, क्षेत्रभेटी व महिमा, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व आपले संरक्षण याविषयीचे संस्कार व शिक्षण देण्यात आले.
सध्याच्या कालावधीमध्ये मुले ही मोबाईल, ऑनलाईन गेम आणि टीव्ही यामध्ये सुट्टीचा कालावधी निरुपयोगी करतात. दुर्दैवाने आई-वडील हे उपजीविकेच्या माध्यमातून कामामध्ये व्यस्त असतात, त्यामुळे सुट्टीच्या दिवसांमध्ये आपल्या मुलांवर दुर्लक्ष होते. त्यामुळे सुट्टीचा संस्काराच्या माध्यमातून सदू उपयोग व्हावा म्हणून या हेतू ने या शिबिराचे आयोजन करण्यात क्षेत्र आळंदी या ठिकाणी आले. या शिबिरात पूर्ण महाराष्ट्रातून मुले सहभागी झालेले होते. या शिबिरा करता सर्व पालक व इतर सृजनांचा सहभाग व सहकार्य चांगल्या प्रकारे मिळाले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.























Join Our Whatsapp Group