पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील श्री संत ज्ञानेश्वर ब्राह्मण सभेच्यावतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कुणाल आयकॉन रोडवरील जिजामाता उद्यानाच्या प्रांगणात मंगळवार दि.२८ रोजी झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी दिपप्रज्वलन आणि सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर शशिकांत कुलकर्णी, वासंती जोशी, सुरेखा कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, स्नेहा चिंचवडकर, शैलजा लोकरस यांनी गाणी आणि कविता सादर केल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अद्वितीय कार्य आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दलची महती वर्णन करणारे विचार यावेळी दिपाली कुलकर्णी, नलिनी देशपांडे, अनुराधा निलेगावकर, श्रीकृष्ण निलेगावकर आणि बुजोणे मॅडम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सभेचे अध्यक्ष विलास जोशी यांनी केले तर सुत्रसंचलन श्रीकृष्ण निलेगावकर आणि स्नेहा चिंचवडकर यांनी केले.