बारामती (Pclive7.com):- बारामतीतून सुनेत्रा पवार यांचा परभव करत सुप्रिया सुळे विजयी झाल्याने राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांना राज्यात मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला महायुतीकडून चार जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी केवळ रायगड या एका जागेवर सुनिल तटकरे हे विजयी झाले आहेत. इतर सर्वच जागांवर अजित पवार यांचे उमेदवार पराभूत झाले आहेत.
देशाचे लक्ष लागुन असलेला बारामती मतदारसंघात शरद पवार यांच्या मुलगी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात होत्या. हा मतदारसंघ पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघात कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे. तर अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुप्रिया सुळे यांना एकुण ५ लाख ५९ हजार ६५४ मते मिळाले असून सुनेत्रा पवार यांना ४ लाख ५० हजार ५८२ मते मिळाली आहेत.
(बातमी अपडेट होत आहे.)