पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दळवीनगर आणि भाेसरी अशा दाेन ठिकाणी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागामार्फत इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या दाेन्ही शाळेत क्षमतेपेक्षा म्हणजे तब्बल 1200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अतिशय कमी आहे. अपुऱ्या शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची माेठी गैरसाेय हाेत असून या दाेन्ही शाळांमध्ये तत्काळ मानधनावर शिक्षकांची नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे पिंपरी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष विशाल काळभाेर यांनी केली आहे.
याबाबत विशाल काळभाेर यांनी महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहूल महिवाल, शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार थाेरात यांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनात क काळभोर यांनी म्हटले आहे की, आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी अनेक गाेर-गरिब पालक पाल्याचा महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. मात्र, महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या दळवीनगर आणि भाेसरीत एक अशा दाेनच प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. दुसरीकडे खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची प्रवेश फी परवडत नसल्याने अनेक पालक महापालिकेच्या शाळेला प्राधान्य देत आहेत. असे असताना या दाेन शाळेत क्षमतेपेक्षा म्हणजे तब्बल बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे अनेक गरजू विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. तसेच इंग्रजी माध्यमांमध्ये 8 वी वर्गपर्यंत वर्ग आहेत, त्याठिकाणी 10 पर्यंत वर्ग सुरू करावेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना नंतर शाळा शोधावी लागणार नाही.
ज्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश झाले आहेत, त्यांना विद्यार्थ्यांच्या जास्त संख्येमुळे आणि शिक्षकांच्या कमी संख्येमुळे याेग्य ते शिक्षण मिळेल का? याबाबत साशंकता वाटत आहे. त्यामुळे महापालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षकांची तत्काळ भरती करावी. त्याचबराेबर इंग्रजी माध्यमाच्या शाळेची संख्या वाढविणे काळाची गरज झाली आहे.
काळभाेरनगर शाळेसाठी नवीन इमारत बांधा..
महापालिकेची काळभाेरनगर येथे माध्यमिक विभागाची शाळा आहे. या शाळेत परिसरातील माेठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, या शाळेची इमारत जुनी झाली असून माेडकळीस आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधावी, अशी मागणीही विशाल काळभाेर यांनी केली आहे.
मराठी आपली मातृभाषा भाषा असली तरी इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिकवावे वाटत आहे. शहरातील विविध नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. मात्र, या शाळेची फी भरमसाठ असल्याने गाेर-गरिबांची मुले अशा शाळेत शिक्षण घेऊ शकत नाहीत. असे पालक महापालिका शाळांना प्राधान्य देत असतात. मात्र, महापालिकेच्या प्राथमिक विभागाच्या फक्त दाेनच इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. त्यामुळे या दाेन शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची माेठी संख्या आणि ‘वेटींग’ असून शिक्षकांची संख्याही कमी आहे. विद्यार्थी संख्येनुसार ज्याठिकाणी 19 ते 20 शिक्षकांची गरज असताना फक्त चार शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे या दाेन्ही शाळेत शिक्षकांची तत्काळ भरती करून इंग्रजी माध्यमाच्या शाळांची अथवा वर्गाची संख्या वाढवावी. पिटी शिक्षक, खेळांसाठी स्वतंत्र शिक्षकांची नेमणूक करावी जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये खेळांची रुची वाढीस लागेल.– विशाल बाळासाहेब काळभाेर, अध्यक्ष, पिंपरी विधानसभा, राष्ट्रवादी काॅंग्रेस.