पिंपरी (Pclive7.com):- पोलिस दलातील भरती प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणीला बुधवारपासून (दि.१९) सुरुवात झाली असून, यात बारावी उत्तीर्ण झालेल्यांसह उच्चशिक्षित तरुणही ‘चान्स’ घेत आहेत. बेरोजगारीमुळे हे सर्वच जण पोलिस शिपाईपदी संधी मिळण्याच्या अपेक्षेने भरतीसाठी दाखल होत आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत शिपाई या पदाच्या २६२ जागांसाठी १५ हजार ४२ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. या उमेदवारांच्या शारीरिक चाचणीला बुधवारी सुरुवात झाली. या भरतीत सहभागी होणारे अनेक उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत. यात कुणी वकील, कुणी डॉक्टर, एमफार्मसी, एमटेक, एमए, बीएस्सी, हे कमी की काय काहीजण तर इंजिनिअर सुद्धा आहेत, ते पोलिसभरतीसाठी दाखल झाले आहेत.
सरकारी नोकरी म्हणून भरती…
शिपाई का असेना पण नोकरी सरकारी मिळतेय ना, मग प्रयल करायला काय हरकत आहे? याच मानसिकतेत अनेक तरुण आहेत. बेरोजगारी वाढत असून, ती एक सामाजिक समस्या बनली आहे, त्यामुळे उच्चशिक्षित तरुण पोलिस भरतीसाठी ठिकठिकाणी जात असल्याचे उमेदवारांच्या बोलण्यातून जाणवले.






















Join Our Whatsapp Group