पिंपरी (Pclive7.com):- एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सुरूंग लावला . त्यानंतर २०१७ साली पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाने निर्विवाद सत्ता मिळवत या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली. या संपूर्ण घडामोडींमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका राहिली ती म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच शहरात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात एक विकासात्मक पर्वाची सुरुवात झाली.

पिंपरी चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता होती. पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. परंतू, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे या दिग्गज नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात प्रवेश केला. भाजपचे आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी पक्ष सक्रीय करण्याबरोबरच पिंपरी चिंचवडच्या विकासकामांचा तगादा लागला. शहराला एक नवी ओळख निर्माण करून दिली. स्मार्ट सिटी, उड्डाणपूल, रस्त्यांचे रुंदीकरण, नालेसफाई, घरकुल योजना, शहर स्वच्छता यांसारख्या विकास कामांना प्राधान्य दिले. म्हणूनच २०१७ साली पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण १२८ जागांपैकी भाजपचे ७७ नगरसेवक निवडूण आले. त्यामुळे, विरोधकांनी गेल्या तीस वर्षात जे केले नाही, ते आम्ही पाच वर्षात करून दाखवू, अशी ठाम भूमिका भाजपचे दिवंगत लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी घेतली. शहराच्या विकासासाठी या जोडीने कंबर कसली.

शहरातील विविध विकासकांना गती देवून स्मार्ट सिटीप्रकल्पाच्या टॉप सिटीमध्ये पिंपरी चिंचवड शहराला समाविष्ट करण्याचा बहुमान मिळविला. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सत्ता काळात पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक प्रलंबित प्रश्न व महत्त्वपूर्ण विकासकामे मार्गी लागली. राज्य सरकारच्या माध्यमातून शहरातील अनधिकृत बांधकामे नियमीतीकरण केल्यामुळे १ हजार चौरस फुटापर्यंत घरे अधिकृत झाली. शहरवासींचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला शास्ती कर हा वारंवार पाठपुरावा करून सरसकट माफ करण्यात भाजपाला यश आले. भाजपाच्या सत्ता काळात सर्वात महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरला तो म्हणजे मेट्रोचा. आज पिंपरी चिंचवड आणि पुणे मेट्रो हा अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्प मानला जात आहे. आता पिंपरी ते निगडी मेट्रोचे देखील काम सुरू झाले असून तोही लवकर पूर्ण होईल असा विश्वास भाजपच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा साडेबारा टक्के परतावा मिळवून देण्यात येईल भाजपा नेतृत्वाला यश आले. भोसरी विधानसभेतील मोशी कचरा डेपो बफर झोन हद्द कमी झाली. कचरा डेपो : वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, बायोमायनिंग, बायोगॅस, सी ॲन्ड डी वेस्ट प्रकल्प हे मार्गी लागले. वाढत्या शहरीकरणामुळे भोसरी विधानसभेतील नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावत होता. मात्र आंद्रा भामा आसखेड प्रकल्पाचे काम भाजपाने हाती घेतले आणि पूर्ण करून दाखवले. शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्मितीचा हा खूप मोठा प्रश्न भाजपाने मार्गे लावला तसेच पिंपरी चिंचवड न्यायालय इमारतीची उभारणी भाजपच्याच काळात झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मेडिकल कॉलेज तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उभारणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. शहरातून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा डीपीआर मंजूर झाला असून इंटरसेप्टर लाईनचे काम सुरू झाले.
अशा प्रकारची अनेक कामे राज्य सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मार्गी लागली असल्याचे मत स्थानिक लोकप्रतिनिधी व्यक्त करत आहेत. आगामी काळातही महापालिका तसेच तीनही विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून भाजपा शहराच्या विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवेल यात शंका नाही.






















Join Our Whatsapp Group