पिंपरी (Pclive7.com):- नेहरूनगर येथील साई प्लाझा या सोसायटीची भिंत आणि त्या बाजूला असलेल्या डॉ. श्रीकृष्ण मराठे यांच्या बंगल्याची सीमा भिंत कोसळली आहे. यामध्ये तीन वाहनांचे नुकसान झाले. ही घटना आज (दि.२४) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास घडली.

अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरूनगर येथील झिरो बॉय चौकात साई प्लाझा सोसायटीची भिंत कोसळली. भिंतीच्या बाजूला पार्क केलेल्या दोन चार चाकी वाहन आणि एक दुचाकी ढिगाऱ्याखाली आडकले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.





















Join Our Whatsapp Group