पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील संजय गांधी नगर, सुभाष नगर, आंबेडकर कॉलनी या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक घरामध्ये पाणी साचले होते. आज सकाळपासूनच माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी या पुरस्थितीचा आढावा घेऊन मदत कार्य सुरू केले आहे.

पिंपरीत पुराचा फटका बसलेल्या संजय गांधी नगर, आंबेडकर कॉलनी, सुभाष नगर परिसरातील नागरिकांना संदीप वाघेरे यांनी सूचना केल्यानंतर कमला नेहरू शाळा, वाल्मिकी आश्रम व कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. सदर ठिकाणच्या नागरिकांची राहण्याची, जेवणाची तसेच लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे.

महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देखील नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. यासाठी सहा.आयुक्त ननावरे, कार्य अभियंता निंबाळकर ,उपअभियंता महेश तावरे, कनिष्ट अभियंता रोकडे, वैद्यकीय अधिकारी सुनिता साळवे यांच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांनी आवशकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन संदीप वाघेरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group