मुंबई (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीने दिलेल्या संधीमुळे अमित गोरखे यांनी विधान परिषदेचा सदस्य म्हणून आज (दि.२८) शपथ घेतली. त्याप्रसंगी विधान परिषदेच्या अध्यक्ष नीलम गोऱ्हे, नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके, मिलिंद नार्वेकर व इतर सदस्य उपस्थित होते.

शपथ घेताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे व भारताच्या संविधानाला स्मरण करून अमित गोरखे यांनी नमन केले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.





















Join Our Whatsapp Group