पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील घरकुल मधील सर्वात मोठ्या बहुउद्देशीय सभागृहाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह नाव देण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन शुक्रवारी (दि.२) महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे देण्यात आले. घरकुल परिसरातील रहिवासी नागरिक, विश्व हिंदू परिषद बजरंग दल, लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य,भ्रष्टाचार निर्मूलन समिती, क्रांतिवीर विचार मंच महाराष्ट्र राज्य व सामाजिक कार्यकर्त्या किर्ती मारुती जाधव यांच्या वतीने देण्यात आले.
हे मागणी करणारे निवेदन पुढे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, नवनिर्वाचित विधान परिषदेवर नियुक्त झालेले अमित गोरखे यांना करण्यात आली. तसेच वर्षानुवर्ष चाललेल्या सभागृहाचे काम युद्ध पातळीवर करून सभागृहाचे नामकरण करून नागरिकांना खुले करून देण्यात यावे असे विनंती सामाजिक कार्यकर्त्या.किर्ती जाधव यांनी केली. निवेदन देण्यासाठी शंकर खवळे, लहू अडसूळ, सोमनाथ कांबळे, नाथा शिंदे,दीपक मोतेवाड, अविनाश शिंदे,महेश गायकवाड, शांताराम खुडे, सतीश शिरसागर, शुभम चव्हाण उपस्थित होते.