
जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी केला. तसेच अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही, याबद्दलही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे नारायणगावात अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी मोठी घोषणाबाजीही करण्यात आली. या घटनेनंतर नारायणगावमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले.
“अजित पवार ज्या पद्धतीने चोरुन चोरुन बैठक घेतात. प्रचारसभांचा गैरवापर करतात. आमचा तालुका पर्यटन तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यटनाच्या तालुक्यात सर्वांना विश्वासात घेऊन काम व्हायला हवं. त्यांना महायुती मान्य नसेल तर अजित पवारांनी तसं स्पष्ट सांगावं. अजित पवारांनी माझा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट घोषित करावे”, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांनी दिली.
“काल आम्हाला समजलं की आज राष्ट्रवादीचा कार्यक्रम आहे. तहसीलदार, कलेक्टर अशा सर्वांना घेऊन बैठकी केल्या जातात. या बैठकीत नेमकं दडलंय काय? हे आम्हाला समजलं पाहिजे. तो आमचा हक्क आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा फोटो गायब करतात. मग जर तुम्हाला महायुती मान्य नसेल, तर अजित पवारांनी ते स्पष्ट सांगावं”, असेही त्या म्हणाल्या.























Join Our Whatsapp Group